Sunday, December 27, 2015

तूर डाळ आमटी - Tur Dal Aaamti

तूर डाळ आमटी - Tur Dal Aaamti
तूर डाळ आमटी - Tur Dal Aaamti

डाळ बनवण्यासाठी  :
१ कप तूर किंवा मुग डाळ
एक चिमूट हळद
२.५ ते ३ कप पाणी

इतर साहित्य :
२ किंवा १ टिस्पून चिंचेचा घट्ट वंगण किंवा आमसूल  + २ टेस्पून गरम पाणी
१. ते २ टीस्पून गोडा मसाला / काळा मसाला
दिड टेस्पून गूळ किंवा आवश्यकतेनुसार
दिड टेस्पून चिरलेली कोथिंबीर
१ कप पाणी नंतर टाकण्याकरिता किंवा आवश्यकतेनुसार
१ ते १.५ टेस्पून खवलेला नारळ (पर्यायी)
मीठ आवश्यकतेनुसार

फोडणीसाठी:
दिड टिस्पून मोहोरी
७ ते ९ कढीपत्त्याची पाने
१ ते २ हिरव्या मिरच्या किंवा ¼ टिस्पून लाल तिखट
¼ चमचा हळद
हिंग एक चिमूटभर
१.५ ते २ टेबलस्पून तेल किंवा तूप

सजावटीसाठी :
चिरलेली कोथिंबीर

कृती -
  • सर्व प्रथम डाळेला चांगले निवडून स्वच्छ धुवून घ्या . प्रेशर कुकर मध्ये 2.5 ते 3 कप पाणी घ्या व त्यात डाळ टाकून एक चिमूटभर हळद घाला . आणि 7 ते 8 शिट्ट्या होईपर्यंत किंवा डाळ पूर्णपणे मुरेपर्यंत उच्च किंवा मध्यम आचेवर डाळ शिजू द्या. 
  • प्रेशर कुकर थंड झाल्यावर कुकरचे झाकण उघडा आणि चमच्याने डाळ मॅश करून बाजूला ठेवा.
  • आता एका पॅन वा कढई मध्ये तेल किंवा तूप गरम करायला ठेवा . त्यात मोहरी टाकून थोडी तडकू द्या . नंतर त्यात हळद आणि हिंग टाका . 
  • कढीपत्त्याची पाने, हिरवी मिरची किंवा लाल तिखट घालून नीट ढवळा आणि डाळ टाकून मिक्स करून घ्या . 
  • आता 1 कप किंवा आवश्यकतेनुसार पाणी टाकून नीट ढवळून घ्या. 
  • नंतर त्यात गोडा मसाला, दिड टेस्पून गूळ, 1 टेस्पून 1.5 किसलेले खोबरे (ऐच्छिक), दिड टेस्पून चिरलेली कोथिंबीर (पर्यायी) आणि मीठ घाला . जर आमटीत तुम्ही चिंचेचा घट्ट कोळ टाकू इच्छित असाल तर डाळ शिजू घालण्या आगोदर 2 टेस्पून पाण्यामध्ये तो 20 मिनिटे भिजू टाका . व चिंचेचा घट्ट कोळ पिळून काढून बाजूला ठेवा व आता तो डाळीत टाका . 
  • मंद आचेवर 10-12 मिनिटे उकळा व  मधून मधून हलवीत रहा जेणेकरून डाळ तळाशी लागणार नाही . 
  • आवश्यकता असल्यास चवीनुसार तुम्ही मीठ, गूळ किंवा गोडा मसाला शेवटी पुन्हा टाकू शकता . 
  • आता तयार झालेली आमटी कोथिंबीरने सजवा व भातासोबत सर्व्ह करा . 

No comments:

Post a Comment