Sunday, December 27, 2015

पालक पनीर - Palak Paneer




पालक – १ जुडी ( 500 ग्राम )
पनीर – 300 ग्राम
तेल – २- 4 चमचे
हींग – १- २चिमुट
जीरा – लहान चमचा
हल्दी पाउडर – १/४ लहान चमचा
टोमॅटो – २- ३
हिरवी मिरची – २
आले
लसणाच्या पाकळ्या – ७-८
बेसन – २ लहान चमचे
मलाई – २ चमचे
लाल तिखट – १/४ लहान चमचा
नमक – स्वादानुसार (एक छोटी चम्मच)
गरम मसाला – १/४ लहान चमचा

कृती -
१)पालकाची पाने स्वच्छ धुवून घ्या एका भांड्यात पाणी उकळत ठेवा व त्यात पालकाची पाने 5-6 मिनिटं शिजू द्या
२) पनीरचे चौकोनी आकाराचे तुकडे करून घ्या. व तेलात तळून घ्या
3) शिजवलेला पालक मिक्सरमधे बारीक करा व बाजूला काढून घ्या नंतर
टोमॅटो, हिरवीमिरची, आले व लसणाच्या पाकळ्या हे सर्व मिक्सरमधून बारीक करून घ्या
४) कढईमध्ये तेल गरम करून घ्या त्यात जिरं ,हिंग , हळद आणि बेसन घालून धोडस परतून घ्या आता त्यामध्ये टोमॅटो, हिरवीमिरची, आले व लसणाची पेस्ट घाला व परतून घ्या २ चमचे मलाई टाका तेल सुटेपर्यंत परतावे
५) नंतर त्यात बारीक केलेला पालक घाला आवश्यकतेनुसार पाणी व मीठ टाका, एक उकळी येऊ द्या
उकल्यानंतर त्यात पनीरचे तुकडे घाला व भाजी 2-3 मिनिटे शिजू द्या थोडा गरम मसाला घाला नंतर गॅस बंद करा
टीप – आपण पनीर तेलात तळून किंवा न तळतही भाजीमध्ये टाकू शकतो

No comments:

Post a Comment