Friday, January 15, 2016

वटाना कोप्ता - Vatana Kopta

वटाना कोप्ता - Vatana Kopta

साहित्य :
  • हिरवा वाटाणा - १ कप 
  • बटाटा - २ मोठे 
  • बेसन - एक मोठा चमचा 
  • अद्रक , लसुन पेस्ट - २ छोटा चमचा 
  • हिरवी मिर्ची - २ ते ३ छोटी 
  • जीर - १ लहान चमचा 
  • हळद - १/४ लहान चमचा 
  • धने पावडर - १ छोटा चमचा 
  • लाल तिखट - आव्श्क्तेनुसार
  • टोमाटो - २०० ग्राम 
  • तेल - तळायला आव्श्क्तेनुसार
  • मीठ - आव्श्क्तेनुसार
कृती :
  • सर्व प्रथम बटाटा एका भांड्यात पाणी टाकून उकळायला ठेवा . बटाटा उकळल्यानंतर सोलून बाजूला ठेवा . आता वाटाणा चांगला धून घेऊन मिक्सी मध्ये बटाटा जरा जाडा बारीक करून घ्या . आता एका भांड्यात बटाटा , वाटाणा , हिरवी मिर्ची (बारीक किसलेली ), थोडी अद्रक लहसून पेस्ट , आणि बेसन चांगले मिक्स करून घ्या . 
  • आता तयार मिश्रणाचे छोटे छोटे गोळे तयार करा . व बाजूला ठेवा . 
  • एका कढईत तेल गरम करायला ठेवा . तेल गरम झाले कि त्यात कोप्ते तळायला टाका व हलके तपकिरी होईपर्यंत तळून घ्या . व एका प्लेटमध्ये जमा करा . 
  • आता टमांटर आणि थोडी हिरवी मिर्ची मिक्सी मध्ये बारीक पेस्ट करून घ्या . 
  • एका कढईत थोडे तेल गरम करायला ठेवा. तेल गरम झाले कि त्यात थोडे जिरे, हळद पावडर आणि धने पावडर टाकून हलके परतून घ्या . आता त्यात टमाटरची पेस्ट टाका व जरा वेळ परता 
  • आता त्यात आव्श्क्तेनुसार पाणी टाका व त्यात आव्श्क्तेनुसार मीठ आणि लाल तिखट टाकून एक उकळी येऊ द्या . उकळी आली कि ग्यास बंद करा व त्यात तळलेले कोप्ते टाका व थोड्या वेळ झाकून ठेवा. 
  • तूमची वाटाणा कोप्त्याची भाजी तयार आहे . ती एका भांड्यात काढून थोड्या हिरव्या कोठीम्बिरणे सजवा . 

Sunday, December 27, 2015

बटाट्याची सुकी चटणी - Batatyachi Suki Chatani

बटाटे - 2 मोठे, उकडून आवश्क्तेनुसार कुस्करून
तेल - २ टे. स्पून
मोहरी - १/२ चमचे
जिरे - १/२ चमचे
हिरव्या मिरच्या - 2 , बारीक चिरलेला
कढीपत्त्याची पाने - 5-6
हळद - ¼ चमचे
आद्रक लसुन ची पेस्ट - १/२ चमचे
हिंग - चिमूटभर
कांदा - १ - २ चिरलेली
मीठ - चवीनुसार
साखर - एक चिमूटभर ( पर्यायी )

कोथिंबीर -  बारीक चिरलेला

कृती -

  • एका  भांड्यात बटाटे उकडून घ्या . व उकडल्यानंतर त्याची साल काढून तो आवश्क्तेनुसार कुस्करून घ्या . 
  • एका कढईत मध्यम आचेवर तेल गरम करून घ्या . त्यात जिरे, मोहरी टाकून तडकू द्या . आद्रक लसुन ची पेस्ट टाका . 
  • नंतर त्यात हिरव्या मिरच्या आणि कढीपत्ता पाने घालून परतून घ्या . 
  •  लगेच चिरलेला कांदा टाका आणि हलका तपकिरी होईपर्यंत परता . त्यात हळद आणि हिंग घालून त्यात, थोडे मीठ घाला. 
  • नंतर तयार झालेल्या फोडणीत कुस्करलेले बटाटे घाला आणि मिक्स करून घ्या . शेवटी चिरलेली कोथिंबीर घाला व सर्व्ह करा. 

तूर डाळ आमटी - Tur Dal Aaamti

तूर डाळ आमटी - Tur Dal Aaamti
तूर डाळ आमटी - Tur Dal Aaamti

डाळ बनवण्यासाठी  :
१ कप तूर किंवा मुग डाळ
एक चिमूट हळद
२.५ ते ३ कप पाणी

इतर साहित्य :
२ किंवा १ टिस्पून चिंचेचा घट्ट वंगण किंवा आमसूल  + २ टेस्पून गरम पाणी
१. ते २ टीस्पून गोडा मसाला / काळा मसाला
दिड टेस्पून गूळ किंवा आवश्यकतेनुसार
दिड टेस्पून चिरलेली कोथिंबीर
१ कप पाणी नंतर टाकण्याकरिता किंवा आवश्यकतेनुसार
१ ते १.५ टेस्पून खवलेला नारळ (पर्यायी)
मीठ आवश्यकतेनुसार

फोडणीसाठी:
दिड टिस्पून मोहोरी
७ ते ९ कढीपत्त्याची पाने
१ ते २ हिरव्या मिरच्या किंवा ¼ टिस्पून लाल तिखट
¼ चमचा हळद
हिंग एक चिमूटभर
१.५ ते २ टेबलस्पून तेल किंवा तूप

सजावटीसाठी :
चिरलेली कोथिंबीर

कृती -
  • सर्व प्रथम डाळेला चांगले निवडून स्वच्छ धुवून घ्या . प्रेशर कुकर मध्ये 2.5 ते 3 कप पाणी घ्या व त्यात डाळ टाकून एक चिमूटभर हळद घाला . आणि 7 ते 8 शिट्ट्या होईपर्यंत किंवा डाळ पूर्णपणे मुरेपर्यंत उच्च किंवा मध्यम आचेवर डाळ शिजू द्या. 
  • प्रेशर कुकर थंड झाल्यावर कुकरचे झाकण उघडा आणि चमच्याने डाळ मॅश करून बाजूला ठेवा.
  • आता एका पॅन वा कढई मध्ये तेल किंवा तूप गरम करायला ठेवा . त्यात मोहरी टाकून थोडी तडकू द्या . नंतर त्यात हळद आणि हिंग टाका . 
  • कढीपत्त्याची पाने, हिरवी मिरची किंवा लाल तिखट घालून नीट ढवळा आणि डाळ टाकून मिक्स करून घ्या . 
  • आता 1 कप किंवा आवश्यकतेनुसार पाणी टाकून नीट ढवळून घ्या. 
  • नंतर त्यात गोडा मसाला, दिड टेस्पून गूळ, 1 टेस्पून 1.5 किसलेले खोबरे (ऐच्छिक), दिड टेस्पून चिरलेली कोथिंबीर (पर्यायी) आणि मीठ घाला . जर आमटीत तुम्ही चिंचेचा घट्ट कोळ टाकू इच्छित असाल तर डाळ शिजू घालण्या आगोदर 2 टेस्पून पाण्यामध्ये तो 20 मिनिटे भिजू टाका . व चिंचेचा घट्ट कोळ पिळून काढून बाजूला ठेवा व आता तो डाळीत टाका . 
  • मंद आचेवर 10-12 मिनिटे उकळा व  मधून मधून हलवीत रहा जेणेकरून डाळ तळाशी लागणार नाही . 
  • आवश्यकता असल्यास चवीनुसार तुम्ही मीठ, गूळ किंवा गोडा मसाला शेवटी पुन्हा टाकू शकता . 
  • आता तयार झालेली आमटी कोथिंबीरने सजवा व भातासोबत सर्व्ह करा . 

मटण बिर्यानी - Matan Diryani Recipe

तांदुळ  - दिड किंवा 2 कप
तेल - 100ml
बारीक़ कापलेले कांदे - ¾ कप
आले लसूण पेस्ट - 1/4 कप
हिरव्या मिरच्या - 5
पुदिन्याची पाने - दोन ओंजळभर
कोथिंबीर - दोन ओंजळभर
लवंगा - २ ते ३
मीरे - ३ ते ४
तेजपत्ता - ३ ते ४ पाने
मटण - दिड किलो
लाल मिरची पावडर - 2 टिस्पून
धणे पूड - 1 दिड टिस्पून
मीठ - चवीनुसार
लिंबू - दिड lemons
पाणी - 4 कप

कृती -
तांदूळ धुवून घेऊन आणि 10-15 मिनिटे बाजूला काढून ठेवा.
कुकरमधे तेल टाकून त्यात बारीक़ चिरलेला कांदा 2 मिनिटांसाठी परतुंन घ्या.
नंतर त्यात आदरक-लसुन ची पेस्ट टाका.
मग लवंगा , मीरे , तेजपत्ता आणि पुदिनायची पाने टाकून 2 मिनीटे परता, आपणास इथे चांगला सुगंध मिळेल.
आता मटणाचे तुकडे घालावे व एकदा आणखी चांगल्या पद्धतीने मिष्रण परता .
नंतर त्यात लाल मिरची पावडर , धणे पावडर आणि मीठ घालून मिश्रणाला चांगल्य पद्धतीने परता, मटणाचे तुकडे शिजेपर्यंत आणि रस्सामध्ये सुसंगतता येईपर्यंत सिजवा.
नंतर त्यात पाणी घालून धुन घेतलेला तांदूळ टाका
सर्व मिश्रणाला चांगले ढवळ्ळुन घ्या आणि कोथिंबीर टाकून कुकरचे झाकन लाउन मद्धम आचेवर सिजु दया
२ - ३ सिटया होउ दया
तैयार झालेली मटन बिर्यानी गरम गरम सर्वे करा

पालक पनीर - Palak Paneer




पालक – १ जुडी ( 500 ग्राम )
पनीर – 300 ग्राम
तेल – २- 4 चमचे
हींग – १- २चिमुट
जीरा – लहान चमचा
हल्दी पाउडर – १/४ लहान चमचा
टोमॅटो – २- ३
हिरवी मिरची – २
आले
लसणाच्या पाकळ्या – ७-८
बेसन – २ लहान चमचे
मलाई – २ चमचे
लाल तिखट – १/४ लहान चमचा
नमक – स्वादानुसार (एक छोटी चम्मच)
गरम मसाला – १/४ लहान चमचा

कृती -
१)पालकाची पाने स्वच्छ धुवून घ्या एका भांड्यात पाणी उकळत ठेवा व त्यात पालकाची पाने 5-6 मिनिटं शिजू द्या
२) पनीरचे चौकोनी आकाराचे तुकडे करून घ्या. व तेलात तळून घ्या
3) शिजवलेला पालक मिक्सरमधे बारीक करा व बाजूला काढून घ्या नंतर
टोमॅटो, हिरवीमिरची, आले व लसणाच्या पाकळ्या हे सर्व मिक्सरमधून बारीक करून घ्या
४) कढईमध्ये तेल गरम करून घ्या त्यात जिरं ,हिंग , हळद आणि बेसन घालून धोडस परतून घ्या आता त्यामध्ये टोमॅटो, हिरवीमिरची, आले व लसणाची पेस्ट घाला व परतून घ्या २ चमचे मलाई टाका तेल सुटेपर्यंत परतावे
५) नंतर त्यात बारीक केलेला पालक घाला आवश्यकतेनुसार पाणी व मीठ टाका, एक उकळी येऊ द्या
उकल्यानंतर त्यात पनीरचे तुकडे घाला व भाजी 2-3 मिनिटे शिजू द्या थोडा गरम मसाला घाला नंतर गॅस बंद करा
टीप – आपण पनीर तेलात तळून किंवा न तळतही भाजीमध्ये टाकू शकतो

बेसन भेंडी - Besan Bhendi

साहित्य -  Ingredients
  • भेंडी  – एक पाव  250 ग्राम/ 250 grams okra
  • तेल – 3 चमचे/ 3 tbsp oil
  • हींग – 1/4 लहान चमचा/  1/4 tsp Asafoetida
  • जीरा – 1/4 लहान चमचा/ 1/4 tsp cumin seeds
  • हळद  – 1/4 लहान चमचा/ 1/4 tsp turmeric powder
  • हिरवी मिरची -2 (उभ्या कापलेल्या )/Green chillies - 2(cut into 2 long halves)
  • बेसन पीठ  – 1 टेबल स्पून/ 1 tbsp gram flour
  • धने पावडर  – 1 लहान चमचा/ 1 tsp coriander powder
  • बडीशेप पाउडर – 1 लहान चमचा/ 1 tsp fennel Seed Powder 
  • मीठ   – चवीनुसार/ salt as required
  • लाल तिखट  – 1/4  लहान चमचा/ 1/4 tsp red chilli powder
  • गरम मसाला – 1/4 छोटी चम्मच/ 1/4 tsp garam masala powder
  • कोथिंबीर/ few chopped coriander leaves
कृती –
1)भेंडी स्वच्छ धुवून पुसून घ्या. भेंडीची देठ कापून भेंडीला उभे चिरून दोन भाग करा
2) कढई मध्ये तेल गरम करून त्यात जिरं, हिंग , हळद ,  हिरवी मिरची,  धने पावडर, बडीशेप पाउडर टाका  नंतर बेसन पीठ टाकून  थोडासा  लालसर रंग येईपर्यंत परतून घ्या
3) परतलेल्या मसाल्यात भेंडी टाका , मीठ , लाल तिखट आणि गरम मसाला टाकून भेंडी चांगली ढवळून  घ्या. म्हणजे भेंडीला मसाला लागेल .
4) भेंडी झाकून  ठेवून  गॅस मंद आचेवर करून शिजवून घ्या. मधून मधून भाजी हलक्या हाताने ढवळून घ्या


5) भेंडी शिजली की त्यात वरुन कोथिंबीर घाला आणि गरम गरम बेसन भेंडी पोळीसोबत   सर्व्ह करा

चोकलेट सामोसा - chocolate samosa

चोकलेट सामोसा - chocolate samosa

साहित्य :
  • दीड कप मैदा 
  • २ ते ३ टीस्पून बारीक कुटलेली साखर 
  • २ टीस्पून तूप 
  • १ कप बारीक किसलेले चोकलेट 
  • १ टेबलस्पून पिस्ता (कापून बारीक केलेले )
  • तेल सामोसे तळन्याकरिता 
थोडा पाक बनविण्याकरिता :
  • ८ टीस्पून  बारीक केलेली साखर 
  • १ चूप पाणी 
कृती :
  • सर्वप्रथम एका भांड्यात मैदा घ्या त्यात साखर आणि तूप टाकून पाणी टाकीत एक घट्ट गोळा तयार करा व थोड्या वेळ बाजूला ठेवा . 
  • एका भांड्यात चोकलेट घ्या त्यात पिस्ता  आणि थोडी साखर टाका व चांगले मिक्स करून बाजूला ठेवा 
  • आता तयार कणकीचा गोळा घ्या व त्याचे हव्या त्या आकाराचे तुकडे करा व त्याची पोळी लाटायला घ्या . तयार पोळीचे मधनं दोन भाग करा व एका भागाला हातात घेऊन तिच्या कडांना थोडे पाणी लावीत दोन्ही कडा जोडा व कोण तयार करा. 
  • आता त्यात थोडे चोकलेट  चे मिश्रण भरा मिश्रण भरून दुसरी बाजू हलक्या बोटांनी बंद करा . 
  • एका भांड्यात ८ टीस्पून साखर घ्या व त्यात जवळ जवळ १ कप पाणी टाकून मिश्रण तयार करा . 
  • आत्ता एका प्यान मध्ये तेल गरम करायला ठेवा , तेल गरम झाले कि तयार सामोसे हलके तपकिरी होईपर्यंत टाळून घ्या . 
  • तयार सामोसे साखरेच्या मिश्रणात टाका व चांगले मिक्स करून एका प्लेट मध्ये काढा . 
  • तुमचे चोकलेट सामोसे तयार आहेत . तुम्ही हे केव्हाही चहासोबतसर्व करू शकता .